फवारणीसाठी ड्रोन खरेदी वर सरकार देणार अनुदान | Drone Anudan yojana

Drone Anudan yojana: आज आपण आधुनिक शेतीच्या एका खूप आधुनिक गोष्टीबद्दल बोलणार आहोत तर आज आपण आपल्या शेतात फवारणी करणाऱ्या ड्रोन बद्दल माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तर सध्याच्या काळामध्ये आपल्या शेतातील पिकांवर फवारणी करण्यासाठी ड्रोन बाजारामध्ये उपलब्ध झालेले आहेत तर विशेष म्हणजे या उपकरणाला अनुदान देण्यासाठी केंद्र शासनाने तयारी देखील दर्शवलेली आहे

Drone Anudan yojana
Drone Anudan yojana

Drone Anudan yojana

पिकाचे संरक्षण खेळाचे व रोग नियंत्रण याशिवाय तणाचे म्हणजे गवताचे व्यवस्थापन सुद्धा या बाबींसाठी ड्रोन चा उपयोग महत्त्वाचा ठरणार आहे यवतमाळ मधील कृषी विज्ञान केंद्र ला ड्रोन उपलब्ध करून सुपूर्द करण्यात आलेले शेतकऱ्यांना या ड्रोन संबंधित माहिती देण्याकरिता गाव पातळीवर मोहीम राबवल्या जाणार आहेत


आता घरकुलसाठी 4.5 लाख ₹ मिळणार हे पात्र


यातून काही गावांमध्ये शेतकऱ्यांना प्रत्यक्षात फवारणी करून दाखवली जाणार आहे तर मित्रांनो या ड्रोन च्या काही विशिष्ट गोष्टी आहेत त्या म्हणजे या ड्रोनला फवारणी करण्यासाठी एक पाणी टाकण्यासाठी एक विशिष्ट टाकी आहे आणि हे ड्रोन 50 वॉटच्या दोन बॅटरी वरती चालते म्हणजेच ह्या ड्रोन ने तुम्ही सात मिनिटात जवळपास एक एकर शेतावर फवारणी करू शकता Drone Anudan yojana

आणि यात अजून एक विशिष्ट गोष्ट म्हणजे ती अशी आहे की तुम्ही या ड्रोनला तुमच्या मोबाईलला किंवा तुमच्या कम्प्युटरला कनेक्ट करू शकता म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला फवारणी करायची आहे त्या ठिकाणी हे ड्रोन प्रत्यक्षात फवारणी करणार आहे कुठलाही अडथळे निर्माण झाला तर ज्या ठिकाणाहून ड्रोन उडाले त्याच ठिकाणी ते परत येईल आणि तुम्हाला किती उंचीवरून फवारणी करायची हे सुद्धा तुम्ही तुमच्या मनाने ठरवू शकता यामुळेच तुमचं पाणी आणि औषध या दोन्ही गोष्टींची सुद्धा बचत या ठिकाणी तुमची होणार आहे आणि मजुरांचा खर्च खूप होतो तो खर्च देखील तुमच्यासाठी वाचणार आहे

तर केंद्र शासनाने विद्यापीठ आणि सरकारी संस्थांना 100% अनुदानावर ड्रोन देण्याचे निर्णय घेतलाय त्यातून कृषी विज्ञान शेतकरी उत्पादक संस्थांना 75 टक्के अनुदानावर ड्रोन दिले जाणार आहे तर सेवा सुविधा केंद्राला खरेदी करण्यासाठी 50 टक्के या अनुदानावर ड्रोन उपलब्ध होणार आहे याशिवाय कृषी पदवीधारक आणि वैयक्तिक शेतकऱ्यांना 45% अनुदानावर हे ड्रोन खरेदी करण्यासाठी उपलब्ध होणार आहे तर या कृषी विभागामार्फत या योजना राबवल्या जाणार आहे तर मित्रांनो या ड्रोन बद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मद्धे सांगा धन्यवाद

Leave a Comment