खाद्यतेल होणार स्वस्त मात्र सोयाबीनला बसणार फटका | Soyabean Oil Import Duty

Soyabean Oil Import Duty: मित्रांनो केंद्र शासनाच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या माध्यमातून 14 जून 2023 रोजी एक नोटिफिकेशन जारी करून डिफाइन सोयाबीन तेलाने रिफाइंड सूर्यफूल तेलाच्या आयातीवरील मूलभूत आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे

soyabean oil import duty
soyabean oil import duty

 

Soyabean Oil Import Duty

आणि मित्रांनो याच निर्णयाचा मोठा फटका देशातील राज्यातील सोयाबीन आणि सूर्यफूल उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे मित्रांनो याच्या संदर्भातील सविस्तराची माहिती अपडेट आजचे पोस्ट च्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत

मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारमध्ये खाद्य तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत आणि याचाच फायदा देशातील नागरिकांना सामान्य नागरिकांना मिळावा यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत

मित्रांनो याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून केंद्र शासनाच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या माध्यमातून 14 जून 2023 रोजी रिफाइंड सोयाबीन तेल आणि रिफाइंड सूर्यफूल तेलाच्या आयातीवरील मूलभूत आयात शुल्क हे 17.5% वरून 5% कमी करून 12.5% करण्यात आलेला आहे

मित्रांनो यापुढे सुद्धा आपण पाहिलं होतं की ऑक्टोबर 2021 मध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या आयातीवरील आयात शुल्क हे 32.5% एवढे वरून 17.5% करण्यात आले होते परंतु मित्रांनो त्यावेळेस आपण जर पाहिलं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खाद्यतेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात होत्या आणि याच पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर देशांतर्गत सुद्धा खाद्यतेलाच्या किमती या निर्णयामुळे कमी झालेल्या नव्हत्या साधारणपणे 15 ते 20 रुपयाची घसरण तेलामध्ये झालेली होती.

Soyabean Oil Import Duty

परंतु याचे दुर्गामे परिणाम या ठिकाणी शेतकऱ्यांना भोगावे लागतात मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर रिफाइंड तेलावरील आयात शुल्क कमी करणे हा एक किमती कमी करण्यामागचा भाग आहे कारण आपण जर पाहिलं तर खाद्य तेलाचे आयात करताना आयात शुल्क हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि आयात शुल्क कमी केल्यामुळे मोठ्या प्रमाणात आयात केली जाईल शासनाच्या माध्यमातून हे आयात शुल्क कमी करण्यात आलेले आहे.

परंतु मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर रिफाइंड तेलाच्या किमती जरी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कमी असल्या तरी ते रिफाईंड तेल देशांमध्ये आयात करणे हे आयातदारांना सुद्धा परवडत नाही त्याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये सुद्धा देशांतर्गत सोयाबीन सूर्यफूल उपलब्ध आहे देशांमध्ये सोयाबीनचा बंपर उत्पादन झालेला आहे

आणि अगदी कमी किमतीमध्ये शेतकऱ्याकडून हे सोयाबीन विकत घेतला जात आहे त्याच्यामध्ये देशांतर्गत उत्पादन होणारं तेल सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्पादित केले जाते आणि अगदी कमी किमतीमध्ये ते व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी उपलब्ध होते मित्रांनो या पार्श्वभूमी वरती किती मोठ्या प्रमाणात आयात केली जाईल हे या ठिकाणी माहित नाही परंतु या आयातीचा या आयात शुल्क कमी करण्याचा जो निर्णय आहे


गाय गोटा अनुदान पहा संपुर्ण माहिती येथे पहा 


याचा मात्र या सोयाबीन आणि सूर्यफूल उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे कारण एकंदरीत आपण जर पाहिलं तर सोयाबीनचे 2022-23 मध्ये भाव खूप मोठ्या प्रमाणात निर्बंध जात आहेत मोठ्या प्रमाणात भावात घसरल झालेल्या अशा पार्श्वभूमी वरती असे जर काही निर्णय घेण्यात आले तर या निर्णयाचा सहाजिकच तात्पुरता परिणाम हा मला दिसून येतो शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण होतं

आणि याचाच फायदा व्यापाऱ्यांच्या माध्यमातून उचलला जातो ज्याच्यामुळे सोयाबीनचे भाव हे पुन्हा एकदा दडपणा खाली येण्याची शक्यता आहे मित्रांनो अशा काही धोरणात्मक बदलामुळे वेळोवेळी शेतमालाच्या भावाला मार बसतो आणि याच्यामध्येच हा एक बदल हा एक निर्णय ज्याच्यामुळे आता नक्की सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एक फटका बसण्याची शक्यता आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वाचा अपडेट होत ज्याची माहिती आपल्याला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्स धन्यवाद

Leave a Comment