Bal Sangopan Yojana 2023 : मुलांच्या संगोपनासाठी दरमहा 2250 रूपये मिळणार

Bal Sangopan Yojana 2023 : बाल संगोपन योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा 2250 रुपये मिळतात अगोदर ही रक्कम अकराशे रुपये दरमहा होती परंतु 31 जानेवारी 2023 रोजी च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही रक्कम 2250 रुपये दरमहा करण्यात आले आहे हे आपण पुढे पोस्ट मद्धे पाहणारच आहोत बाल संगोपन योजनेचा लाभ 58 हजार पेक्षा जास्त लाभार्थी घेत आहेत आणि बऱ्याचशा लोकांना या योजनेबद्दल माहिती नसल्यामुळे ते या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत

 

Bal Sangopan Yojana 2023
Bal Sangopan Yojana 2023

 

तर मित्रांनो आज आपण या पोस्ट च्या माध्यमातुन शासनाचे बाल संगोंपण योजनेविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत जसे की या योजनेचा लाभ कसा घ्यावा या योजनेसाठी अर्ज कसा व कुठे करावा अर्ज केल्यानंतर किती दिवसात लाभ मिळतो या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतो या योजनेच्या लाभ घेण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे अशी सविस्तरपणे माहिती आज आपण या पोस्ट मद्धे जाणून घेणार आहोत जेणेकरून सर्वांना या योजनेविषयी माहिती होईल व सर्वच पात्र लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतिल

बालसंगोंपण योजना काय आहे

मित्रांनो सगळ्यात आधी आपण बाल संगोपन योजनेविषयी थोडक्यात जाणून घेऊ मित्रांनो बाल संगोपन योजना ही 2005 मध्ये केंद्र शासन व राज्य शासन अंतर्गत सुरू करण्यात आली परंतु ही योजना पूर्णपणे महाराष्ट्र राज्याच्या निधीतून राबवली जाते व फक्त महाराष्ट्रातील लाभार्थीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात इतर राज्यातील लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत

Bal Sangopan Yojana 2023

ही योजना महिला व बालविकास विभागाच्या वतीने राबवली जाते या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला लाभार्थ्याला 2250 रुपयाची आर्थिक मदत ते त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते अगोदर या अनुदानाची रक्कम अकराशे रुपये दर महिन्याला होती परंतु आता या रकमेत वाढ करण्यात आली आहे आता ही रक्कम 2250 रुपये प्रति महा करण्यात आले आहे

या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जो निर्णय झालेला आहे तो सुद्धा मी तुम्हाला वाचुन या ठिकाणी दाखवतोय तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो मंत्रिमंडळाचा निर्णय बालसंगोपन योजनेच्या सहाय्यक अनुदानात मोठी वाढ महिला व बालविकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या बालसंगोपन योजनेच्या सहाय्यक अनुदानात मोठी वाढ परिपोषण अनुदान अकराशे पन्नास वरून 2250 संस्था रुपये 125 वरून 250 तर अशा पद्धतीने या ठिकाणी बाळ संगोपन योजनेच्या सहाय्यक अनुदानात 1100 वरून 2250 एवढी वाढ करण्यात आलेली आहे


                          योजना wepsite


या ठिकाणी तुम्ही दिनांक पाहू शकता हा निर्णय 31 जानेवारी 2023 चा आहे तसेच या ठिकाणी शासन निर्णय सुद्धा करण्यात आलेला आहे 17 फेब्रुवारी 2023 रोजी शासन निर्णय काढण्यात आलेला आहे.
महिला व बाल विकास विभाग अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या बाल संगोपन योजनेच्या सहाय्यक अनुदानात वाढ करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे

योजने चा लाभ कोन घेऊ शकतो

तर मित्रांनो आता या योजनेचा लाभ हा कोण कोण घेऊ शकतो याविषयी आपण आता या ठिकाणी जाणून घेऊ तर या ठिकाणी निराधार व गरजू बालक ज्या मुलांना आई किंवा वडील नसतील असे मुलं ज्या मुलांना आई वडील दोन्ही नसतील असे मुलं कोविड कालावधीत पालक गमावलेले मुलं जे परिवार आपल्या मुलांना सांभाळण्यासाठी असमर्थ असतील ते बालके मतिमंद मुलं अपंग मुले दोन्ही पालक अपंग आहेत असे मुलं एचआयव्हीग्रस्त पालकांचे मुलं ज्या मुलांची आई वडील गंभीर आजाराने रुग्णालयात भरती असतील

असे मुलं ज्या बालकांचे पालक मानसिक रुग्ण आहेत ते बालके ज्यांचे आई-वडील घटस्फोटीत आहेत ते बालके ज्या मुलांच्या पालकांचा पत्ता लागत नाही अशी बाळाचे जे दत्तक देणे शक्य होत नाही असे बालके ज्या बालकांना कुष्ठरोग झाला आहे असे बालके इत्यादी प्रकारची मुलं या योजनेचा लाभ घेऊ शकतात


                  हे पण वाचा: नवीन विहीर अनुदान योजना


 

या योजनेअंतर्गत या पात्र मुलांना एका मुलासाठी एका 2250 रुपये दर महिन्याला मिळतात अशी एका वर्षाला 27 हजार रुपये मिळतात हे पैसे वय १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत महिन्याला मिळत जातात

लाभ घेन्या साठी पात्रता काय आहे

तर मित्रांनो आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती पात्रता आपल्याला आवश्यक आहे याविषयी आता पण जाणून घेऊ तर लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा त्याच्यानंतर लाभार्थ्याचे वय शून्य ते अठरा वर्षाच्या दरम्यान असावे अर्जदार या योजनेच्या निकषात बसला पाहिजे एका कुटुंबातील दोन किंवा जास्त मुलांनाही या योजनेचा लाभ दिला जातो तर अशा प्रकारची या ठिकाणी पात्रता आहे

कागद पत्रे कोनती लागतील

तर मित्रांनो आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे याच्याविषयी आता आपण जाणून घेऊ तर मित्रांनो या योजनेच्या लाभ घेण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला या योजनेचा (अर्जाचा नमुना )लागतो जो आपल्याला कुठल्याही झेरॉक्सच्या दुकानावरती किंवा मग संबंधित ऑफिसमध्ये मिळून जाईल

 

त्याच्यानंतर या ठिकाणी मुलांचे शाळेचे (बोनाफाईट )आपल्याला लागतं किंवा त्यांचा जन्म दाखला

त्याच्यानंतर (आधार कार्ड चे झेरॉक्स)

प्रत या ठिकाणी पालकांचे व बालकांचे असे दोघांचेही आधार कार्डची झेरॉक्स परत आपल्याला लागते त्याच्यानंतर तलाठी यांचा (उत्पन्नाचा दाखला ) याठिकाणी आपल्याला लागतो त्याच्यानंतर पालकांची (मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र) म्हणजे या ठिकाणी जर आई वारली असेल तर आईची मूर्ती दाखला किंवा वडील वारले असतील तर वडिलांचा मृत्यू दाखला आपल्याला या ठिकाणी लागतो त्याच्यानंतर पालकांचा रहिवासी दाखला रहिवासी दाखला आपल्याला ग्रामपंचायत किंवा नगरपालिका यांच्या लागतो. त्याच्यानंतर मुलांचे बँकेचे

(पासबुकची झेरॉक्स) त्याच्या नंतर (मृत्यूचा अहवाल) पालकांचा मृत्यू कशामुळे झाला उदाहरणांचा या ठिकाणी कोविंड झाला असेल तर मृत्यू दाखला

राष्ट्रात त्याच्यानंतर राहते घरासमोर पालकांसोबत बालकांचा या ठिकाणी (फोटो )लागतो त्या फोटोची साईज या ठिकाणी चार बाय सहा मध्ये असली पाहिजे प्रत्येक मुलासाठी या ठिकाणी वेगळा फोटो लागणार आहे जर एकापेक्षा जास्त मुलांचा या ठिकाणी लाभ घ्यायचा असेल तर प्रत्येकासोबत या ठिकाणी वेगवेगळ्या फोटो तुम्हाला लागणार आहे

त्याच्यानंतर मुलांचे पासपोर्ट दोन फोटो लागतील तसेच या ठिकाणी पालकांचे सुद्धा पासपोर्ट फोटो लागणार आहेत तर एवढे सगळे डॉक्युमेंट्स या ठिकाणी बालसंगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत

अर्ज कूठे करायचा

योजनेचा अर्ज भरून झाल्यावर सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडा

हा अर्ज मंजूर करण्यासाठी जिल्हाच्या ठिकाणी असणारे बालकल्याण समितीकडे सादर केला जातो

व ती समिती अर्ज मंजूर करते तसेच बाल संगोपन योजनेची माहितीसाठी व फॉर्म जमा करण्यासाठी तालुका पंचायत समिती ऑफिसमध्ये बाल संरक्षण अधिकारी यांना भेटावे

किंवा जिल्हाच्या ठिकाणी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय या ठिकाणी भेटावे लागते

 

तर अशा पद्धतीने तुम्ही बाल संगोपन योजनेचा लाभ घेऊ शकता

मित्रांनो तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा व अठरा वर्षापर्यंत शिक्षणाच्या खर्चापासून चिंतामुक्त व्हावे

तर मित्रांनो हा पोस्ट आपल्या मित्रा बरोबर share करा

Leave a Comment