Driving Licence Online: घरबसल्या 10 मिनिटांत मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, या सोप्या पद्धतीने

Driving Licence Online: ड्रायव्हिंग लायसन्स काढणे म्हणजे मोठं कठीण काम कारण यासाठी खूप धावाधाव करायला लागायची. कार्यालयं फिरा, दलालांना शोधा. पण आता सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देत ही प्रक्रिया ऑनलाईन केल्यामुळे जनतेचा त्रास कमी झाला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने Learner’s License साठीच्या प्रक्रियेत काही बदल केले आहेत. यामध्ये आता ड्रायव्हिंग टेस्टसाठी तुम्हाला RTO कार्यालयात जाण्याची गरज नाही. आता लर्निंग लायसन्स काढण्यासाठी तुम्हाला आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. तुमचा आधार क्रमांक मोबाईल नंबरशी लिंक करुन, तपशील देऊन तुम्हाला लर्निंग लायसन्स मिळवता येणार आहे..

  Driving Licence Online: वाहन अधिनियम १९८८ अन्वये सार्वजनिक ठिकाणी वाहन चालविण्यासाठी लायसेन्स आवश्यक असते. वाहन परवाना मध्ये  असे प्रकार पडतात.

१. मोटार सायकल ५० सी.सी.            

२. मोटार सायकल विना गिअर..

३. मोटार सायकल विना गिअर सह..      

४. लाईट मोटार व्हेईकल..

५. लाईट मोटार व्हेईकल नॉट ट्रान्सपोर्ट..   

६. लाईट मोटार व्हेईकल ट्रान्सपोर्ट..

७. हेवी मोटार व्हेईकल..

Driving Licence Online: लायसन्सविषयीचे सर्वसाधारण नियम

१. कोणत्याही चालकास गाडीचे वैध लायसन्स असल्याखेरीज सार्वजनिक ठिकाणी चालवता येत नाही..

२. लर्निंग लायसन्स असलेल्यांना प्रशिक्षक आणि गाडीवर L खूण करणे बंधनकारक.

३. १६ ते १८ वर्षामधील व्यक्तीस ५० सीसीपेक्षा कमी इंजिन क्षमतेच्या विनागिअर वाहनांचे लायसन्स मिळविता येते..

१८ वर्षांपुढील व्यक्तीस ट्रान्सपोर्ट व्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनाचे लायसन्स मिळविता येते..

ट्रान्सपोर्ट लायसन्सकरिता २० वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे..

मुदत आणि नूतनीकरण

लर्निंग लायसन्सची वैधता ६ महिने असते. त्यानंतर त्याचे एकदाच नूतनीकरण करता येते..

ट्रान्सपोर्ट लायसन्ससाठी ३ वर्षांची कालमर्यादा असते..

ज्वालाग्राही पदार्थांची वाहतूक करणाऱ्या चालकाच्या लायसन्सची वैधता १ वर्षे असते. त्यानंतर एक दिवसाचे उजळणी प्रशिक्षण पूर्ण करून लायसन्सचे नूतनीकरण करावे लागते..

नॉन ट्रान्सपोर्ट लायसन्सची वैधता लायसन्स मिळालेल्या दिवसापासून २० वर्षे किंवा वयाची ५० वर्षे पूर्ण होईपर्यंत, यापैकी जे अगोदर पूर्ण होईल तोपर्यंत असते..

लायसन्सकरिता अपात्र व्यक्ती : शुद्ध हरपणे, झटके येणे, रातांधळेपणा, बहिरेपणा, रंग चटकन न ओळखणे, २५ ‌मीटर अंतरावरून अंक/ अक्षर न ओळखू शकणारी, हात किंवा पाय नसणारी व्यक्ती..

प्रत्येकाची इच्छा आहे की आपले काम ऑनलाइन घरी बसून झालेले बरे, म्हणून सरकारने आता ड्रायव्हिंग लायसन्स बनविण्यासाठी ही सुविधा ऑनलाईन केली आहे. कोणतीही व्यक्ती घरून ड्रायव्हिंग परवान्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकते, त्यासाठी तुम्हाला कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही आणि एजंटला पैसे द्यावे लागणार नाहीत. परंतु आपल्याकडे सर्व आवश्यक driving license documents उपलब्ध असतील तरच ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाते .

driving licence online apply यासाठी आपल्याला https://sarathi.parivahan.gov.in/ या साईट वर जाऊन फॉर्म भरावा लागेल.

Leave a Comment