ice cream factory video आइस्क्रीम कसे तयार केले जाते? पाहा फॅक्टरीमधील व्हिडिओ

 

ice cream factory video तुम्हाला आइस्क्रिम खायला आवडते? उन्हाळा असो की हिवाळा थंडगार आइस्क्रिम खाण्याची मज्जा काही वेगळी असते. तुम्हाला आइस्क्रिम खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही काय करता? बाजारात जाऊन पटकन हवे ते आइस्क्रिम घेऊन येता. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, हे आइस्क्रिम कसे तयार केले जाते? नसेल तर हा व्हायरल व्हिडीओ पाहा. सोशल मीडियावर चॉकलेट आइस्र्क्रिम स्टिक तयार करण्याचा फॅक्टरीमधील व्हिडीओ व्हायरल होत आहे.

 

येथे क्लिक करून व्हिडिओ पहा

 

व्हायरल व्हिडीओमध्ये फॅक्टरीमध्ये मोठ्या प्रमाणात चॉकलेट आइस्क्रिम स्टिक्स कसे तयार केले जाते हे दिसते आहे. हा व्हिडिओ X हँडल सायन्स गर्ल या एक्स अकांऊटवर पोस्ट केला आहे. हे मूळत: जॉर्ज अर्टेगा यांनी २०२१ मध्ये इंस्टाग्रामवर शेअर केले होते. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,” मॅग्नम आइस्क्रीम कसे बनवले जातात.”

व्हिडीओमध्ये दिसते आहे की, चॉकलेट आइस्क्रिम स्टिक बनवण्याची प्रक्रिया दाखवली आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला एका मशीनमधून स्टिक लावलेले आइस्र्क्रिम दिसत आहे. ते आइस्र्क्रिम एका धावत्या ब्लेटवरुन पुढे जात आहे, त्यानंतर मशीन द्वारे एक- एक आइस्क्रिम स्किट पकडून ती चॉकलेटमध्ये बुडवले जात आहे. त्यानंतर ते मशिनद्वारे पॅक केले जात आहे. व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क होऊन जाल.

 

Leave a Comment